Tuje Ni Maje Naate Kay? Lyrics & Tabs by Salil Kulkarni

Tuje Ni Maje Naate Kay?

guitar chords lyrics

Salil Kulkarni

Album : Sang Sakhya Re marathi PlayStop

तुझे नी माझे नाते काय?...
तु देणारी... मी घेणारा
तु घेणारी... मी देणारा

कधी न कळते रुप बदलते
चक्राचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते?
अन आपुल्यातुन समान काय?...
तुझे नी माझे नाते काय?...
मला खात्री आहे तिला ही झोप आली नसेल
सुंदर स्वप्न पडत असतील
पण कुशीवर वळेल.उसासे घेईल
तिच्या समोर ही तेच ढग जे माझ्या समोर
तिच्या समोर ही तेच धुके जे माझ्या समोर
तिचे माझे स्वल्प विराम ही सारखे
अन् पूर्ण विराम ही

तिच्या समोर ही तेच धुके जे माझ्या समोर
तिचे माझे स्वल्प विराम ही सारखे
अन् पूर्ण विराम ही
म्हणून तर मी असा आकंठ जागा असता
तिची ही पापणी पूर्ण मिटली नसेल
मला खात्री आहे तिला झोप आली नसेल
सुखदु: खाची होता वृष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविन सहजची घडते
समेस येता टाळी पडते!
कुठल्या जन्माची लय जुळते?
या मात्रान्चे गणित काय?
तुझे नी माझे नाते काय?...
बगिचे लावले आहेत आम्ही एकत्र... एकाकी
माती कालवली आहे आम्ही चार हातांनी
नखात आहे माती आम्हा दोघांच्या... अजूनही
मनात फुलं आहेत आम्हा दोघांच्या... अजूनही
दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत!
दोघांच्याही हातावर एकमेकांच्या भाषा आहे!
रात्र होऊन जाईल चंद्र चंद्र आणि मी जागाच असेन;
तेव्हा बर्फाच्या अस्तराखाली वाहत राहावी नदी
तशी ती ही जागीच असेल...
मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल...
नात्याला या नकोच नाव
दोघांचाही एकच गाव!
वेगवेगळे प्रवास तरीही
समान दोघांमधले काही!
ठेच लागते एकाला
का रक्ताळे दुसर्याचा पाय?
तुझे नी माझे नाते काय?...

Like us on Facebook.....
-> Loading Time :0.0086 sec