Ushkal Hota Hota Lyrics & Tabs by Shreya Ghoshal
Ushkal Hota Hota
guitar chords lyrics
उषःकाल होता होता काळरात्र झाली!
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली!
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली!
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हा साप हे विषारी!
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली!
तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हावरी संसारची उडे धूळमाती!
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली!
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली!
उभा देश झाला आता एक बंदिशाला
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली!
उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला!
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली!
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे!
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे!
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळली!
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले, रवींद्र साठे
चित्रपट - सिंहासन (१९७९)