Mala He Dattaguru Lyrics & Tabs by Asha Bhosle
Mala He Dattaguru
guitar chords lyrics
ब्रह््मा, विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले
मला हे दत्तगुरू दिसले -- 2
माय उभी ही गाय होउनी, पुढे वासरू पाहे वळूनि
कृतज्ञतचे श्वान बिचारे, पायावर झुकले
मला हे दत्तगुरू दिसले -- 2
चरण शुभंकर फिरता तुमचे, मन्दिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनि ह्रदयपाखरू स्वानंदी फिरले
मला हे दत्तगुरू दिसले -- 2
तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया -- 2
तुमच्या हाति माझ्या भवती, औदुंबर वसले
मला हे दत्तगुरू दिसले -- 2