Ka Kalena Lyrics & Tabs by Swapnil Bandodkar
Ka Kalena
guitar chords lyrics
का कळेना कोणत्या क्षणी
हरवते मन कसे
उमलती कशा धुंद भावना
अलगद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे!
एक मी एक तू
शब्द मी गीत तू
आकाश तू आभास तू
सार्यात तू ...
ध्यास मी श्वास तू
स्पर्श मी मोहोर तू
स्वप्नात तू सत्यात तू
सार्यात तू ...
पंख लावूनी उडत चालले
स्वप्नात तू सत्यात तू
सार्यात तू ...
पंख लावूनी उडत चालले
मन हे तुझ्यासवे
तुझा मी माझी तू
कधी केव्हा कसे
जुळले बंध हे
अबोल प्रीत ही हे नाते नवे
अजब रीत हे स्वप्न नवे ...
या भोवताली काही दिसेना
तू आणि मी मी आणि तू
बाकी उरेना.
होतो कुठे अन आलो कोठे
रस्ता कसा जाई कुठे
काही कळेना ...
का कळेना कोणत्या क्षणी
हरवते मन कसे
उमलती कशा धुंद भावना
अलगद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे
गोड नाते हे जन्मांतरीचे!